जयश्री गडकर (Jaishri Gadhkar): मराठी चित्रपट सृष्टीतील एक रुपेरी पान

by Shekhar Jaiswal

Jaishri Gadhkar

राठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील एक झळाळत रुपेरी पान म्हणजे जयश्री गडकर (Jaishri Gadhkar),  ज्यांनी 50 वर्षे आपल्या समृद्ध अभिनयाने या मराठी चित्रपट सृष्टीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले, त्या जयश्री गडकर (Jaishri Gadhkar) यांचा जन्म 21 फेब्रुवारी 1942 रोजी कनस गिरी कारवार जिल्ह्यात म्हणजे आताच्या कर्नाटक मध्ये झाला.

वयाच्या अवघ्या पाचव्या-सहाव्या वर्षी त्यांचं कुटुंब मुंबईला स्थायिक झालं. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे  मुंबईतील महानगरपालिकेच्या शाळेत झाल. शिक्षणाची आवड असतानाही  त्यांना फारस शिक्षण घेता आलं नाही.  त्यांना गाण्याची  व नृत्याची लहानपणापासूनच आवड होती. गोड गळा  आणि तालासुरांचे असणारे उपजत ज्ञान, यामुळे त्यांना गायनाची ही आवड होती. त्यामुळे त्या सुरुवातीच्या काळात मास्तर नवरंग  यांच्याकडे गाणे शिकल्या. आपल्या सौंदर्य व अभिनय या गुणांनमुळे ओळखल्या जाणाऱ्या जयश्री गडकर (Jaishri Gadhkar) यांच्या कारकीर्दीची सुरुवात ही एक बालकलाकार म्हणून झाली. व्ही. शांताराम यांच्या ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटात एका गाण्यात अभिनेत्री संध्या यांच्यामागे समूहात नृत्य करणारी एक युवती असा त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर 1957 मध्ये फिल्मिस्तान चे ‘आई मला क्षमा कर’आणि ‘पहिलं प्रेम’ या दोन चित्रपटांमधून त्यांनी प्रमुख भूमिका केल्या. त्याच दरम्यान आलिया भोगासी हा चित्रपट प्रदर्शित झाला या चित्रपटात जयश्री गडकर (Jaishri Gadhkar) यांनी राजा गोसावी बरोबर प्रमुख भूमिका साकारली आणि पुढे जाऊन जयश्री गडकर (Jaishri Gadhkar) नावाचा एक अलौकिक इतिहास या मराठी चित्रपट सृष्टी मध्ये साकारला गेला.

पायात चाळ बांधून तमाशाच्या बोर्डावर देहभान हरपून नाचणारी,  नाचता नाचता आपल्या मादक नेत्र कटाक्षाने अनेकांच्या काळजात कळ आनणारी जयश्री गडकर (Jaishri Gadhkar) आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या डोळ्यात देखील अक्षरशः अश्रूंचा ओलावा निर्माण करत असत आणि आपल्या लाडेलाडे बोलण्याने, दिलखुलास हसन्याने प्रेक्षकांच्या मनाला गुदगुल्या ही करू शकते, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. अभिनयाची उपजत देणगी आणि त्यासोबतच अपार मेहनतीची जोड आणि स्वतःला कोणत्याही एका चौकटीत बंदिस्त करून न घेता केलेला वेगवेगळा अभिनय यामुळे जयश्री गडकर (Jaishri Gadhkar) या मराठी चित्रपट सृष्टी मध्ये अष्टपैलू अभिनेत्री म्हणूनच ओळखला गेल्या.

झनक झनक पायल बाजे या चित्रपटापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे आलिया भोगासी या चित्रपटातून त्यांची नायिका म्हणून कारकीर्द सुरू झाली. राजा परांजपे दिग्दर्शित ‘गाठ पडली ठका ठका’ या चित्रपटात त्यांना सर्वप्रथम महत्त्वाची भूमिका मिळाली. त्यांनी ‘सांगत्ये ऐका’ ‘अवघाची संसार’ मानिनी, रंगपंचमी, शाहीर परशुराम, बाप माझा ब्रह्मचारी, मोहित्यांची मंजुळा, सवाल माझा ऐका, वैशाखवणवा, साधी माणसं, पाटलाची सून, एक गाव बारा भानगडी, जिव्हाळा, घरकुल, सुगंधी कट्टा, आदी महत्त्वाच्या चित्रपटांमधून भूमिका साकारल्या.तमाशाप्रधान, ग्रामीण चित्रपटातील नायिका अशी त्यांची ओळख तयार झाली होती.त्या वेगळ्या भूमिकांना न्याय देऊ शकणार नाहीत अशी त्यांच्याविषयी चर्चा होत असतानाच आपल्या ‘मानिनी’ चित्रपटातून या चर्चेला त्यांनी चोख उत्तर दिले.

1961 साली प्रदर्शित झालेल्या मानिनी चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वप्रथम राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 1959 मध्ये सांगते ऐका या चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टीत इतिहास घडवला. यामध्ये जयश्री गडकर (Jaishri Gadhkar) यांनी एका तमास गिरणीची भूमिका रंगवली. हा चित्रपट मराठीतला त्या काळातला सुपरहिट चित्रपट ठरला. या चित्रपटातील जयश्री यांच्या ‘बुगडी माझी सांडली ग’ या गाण्यावरील लावणी नृत्याने त्या उत्कृष्ट नृत्यांगणा म्हणून पुढे आल्या. त्यांची ही लावणी आजही महाराष्ट्रातील लावणी प्रेमी व तरुणाईला वेड लावते.

या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना ‘रसरंग’पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही व पुढील पन्नास वर्ष मराठी चित्रपट सृष्टीत आपले स्थान अढळ ठेवले. त्यांनी तमाशा पटा बरोबरच अनेक कौटुंबिक, भावनाप्रधान, विनोदी, ऐतिहासिक चित्रपटातूनही आपला अभिनय प्रेक्षकांसमोर सादर केला. मराठीबरोबरच त्यांनी ‘एक अरमान मेरा’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपट सृष्टी सही पदार्पण केले. अभिनेते अशोक कुमार यांच्याबरोबर नाइकी ची भूमिका असलेला प्रायव्हेट सेक्रेटरी हा त्यांचा चित्रपट चांगलाच भावला. 

हिंदी चित्रपट सृष्टीत धार्मिक, पौराणिक, चित्रपटात त्यांच्या भूमिका संस्मरणीय ठरल्या. तसेच त्यांचे सारंगा चित्रपटातील त्यांच्यावर चित्रित झालेले ‘तेरी याद में’  हे गाणे आजही रसिकांच्या स्मरणात आहे. त्यांनी आपल्या प्रदीर्घ चित्रपट कारकीर्दीत 250 हून अधिक चित्रपटात भूमिका केल्या. जगन्नाथाचा रथ या चित्रपटाचे नायक बाळ धुरी यांच्याशी 1975 साली त्यांनी विवाह केला.1978 मध्ये आलेल्या लव कुश या भोजपुरी चित्रपटात देखील त्यांनी सीतेची भूमिका करून आपली इकवेगळी ओळख निर्माण केली,विशेष म्हणजे रामानंद सागर यांच्या दूरदर्शनवर सर्वाधिक गाजलेल्या रामायण या मालिकेत या दाम्पत्याने दशरथ – कौशल्या यांची भूमिका साकारली.

त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अशी असावी सासू, एक गाव बारा भानगडी, दिसतं तसं नसतं, मोहित्यांची मंजुळा, वैजंता, वैशाखवणवा, सवाल माझा ऐका, सांगत्ये ऐक, अवघाची संसार, बाप माझा ब्रह्मचारी, मोहित्यांची मंजुळा, साधी माणसं, कडकलक्ष्मी, मल्हारी मार्तंड, आई कुणा म्हणू मी, पाटलाची सून, सुन लाडकी या घरची, जिव्हाळा, आदी महत्त्वाच्या चित्रपटांमधून भूमिका साकारल्या.

त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला, गेला हटकून बाई भरल्या बाजारात,  बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला,  तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण नाक्याचं, फड सांभाळ तुर्याला ग आला, पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा,  माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं,  ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहुदे,  चढाओढीने चढवीत होते, नाचू किती लाजू किती कंबर लचकली या  अजरामर गीतामुळे त्या कायम प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरल्या. सहजसुंदर अभिनयाची देणगी त्यांना लाभली होती.  त्यांनी साकारलेलं प्रेमळ व खास्ट स्त्रीच रूप सारख्याच ताकदीने प्रत्ययाला येत असे. म्हणूनच प्रेक्षकांच्या त्या चिरकाल स्मरणात राहतील. अशा या चतुरस्त्र अभिनेत्रीच  29 ऑगस्ट 2008 रोजी मुंबई येथे निधन झाले.

लेखक-पद्माकर

जयश्री गडकर यांच्या बद्दल व या लेखा बद्दल आपले अभिप्राय खाली दिलेल्या Comment-Box मध्ये नोंदवायला मात्र विसरू नका,तुमच्या एका Comment मुळे आमच्या लेखकास एक शक्ती व उत्त्साह मिळते.

“तुम्ही आमच्या कामाला पाठिंबा द्याल का? कृपया आज Marathimonday.com ला आर्थिक भेट देण्याचा विचार करा”


Shekhar Jaiswal

Leave a Comment