जयराम कुलकर्णी (Jairam Kulkarni)

by Shekhar Jaiswal

Jairam Kulkarni

मराठी कलासृष्टीला लाभलेला एक हरहुन्नरी अभिनेता म्हणजे जयराम कुलकर्णी (Jairam Kulkarni). त्यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९३२ रोजी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे येथे झाला. विविध चित्रपटांत त्यांनी साकारलेली वरिष्ठ पोलीस अधिकार्याची भूमिका विशेष ठसा उमटवणारी ठरली. त्यांच्या मराठी चित्रपटांमध्ये अनेक भूमिका गाजल्या. यामध्ये ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘माझा पती करोडपती’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘थरथराट’, ‘भुताचा भाऊ, ‘दे दणादण’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘धुमधडाका’, ‘झपाटलेला’ अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे यांच्यासोबत त्यांनी अनेक चित्रपटांत काम केले. शाळेत असल्यापासूनच जयराम (Jairam Kulkarni) यांना अभिनयाची आवड होती. त्यामुळे सहावी-सातवीमध्ये असताना शाळेत त्यांनी ‘मोरूची मावशी’ या नाटकात मावशीचे काम केले; तोच त्यांच्या आयुष्यातील रंगभूमीवरचा पहिला प्रवेश ठरला. स.प. महाविद्यालयात श्रीकांत मोघे, शरद तळवळकर यांच्यासोबत पुलंच्या ‘अंमलदार’ नाटकात ‘हणम्या’ ही भूमिका जयराम (Jairam Kulkarni) यांनी साकारली. तेव्हापासून खणखणीत ग्रामीण भाषा बोलणारा एकच नट अशी त्यांची नवीन ओळख निर्माण झाली. जयराम (Jairam Kulkarni) यांनी आकाशवाणीसाठी खास ग्रामीण भाषेत केलेले कार्यक्रम श्रोत्यांच्या चांगलेच पसंतीस पडले.

जयराम (Jairam Kulkarni) यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. इयत्ता सातवीत असताना त्यांनी ‘मोरूची माउशी’ नाटकात मावशीची भूमिका साकारली होती. गावात शिक्षणाची जेमतेम सोय असल्याने त्यांनी पुण्यातील स. प. महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथेच श्रीकांत मोघे, शरद तळवलकर यांच्याशी मैत्री झाली. पुढे १९५६ साली आकाशवाणी पुणे केंद्रात नोकरी केली. व्यंकटेश माडगूळकर यांचे सहाय्यक म्हणून जयराम (Jairam Kulkarni) यांची नेमणूक झाली होती. त्यामुळे माडगूळकर यांच्या लेखनाशी जयराम (Jairam Kulkarni) यांचा जवळचा संबंध आला. त्यांच्या ‘बनगरवाडी’ या कादंबरीचे वाचन जयराम (Jairam Kulkarni) हे कार्यक्रमाच्या माध्यमातून करायचे. कादंबरीतील कोणते पात्र कोणी करायचे यापासून ते सराव आणि ध्वनिमुद्रणापर्यंतचे काम जयरामच पाहत. तात्यांचा म्हणजेच माडगूळकर यांचा सहायक असल्याने कामाच्या निमित्ताने जयराम (Jairam Kulkarni) यांना त्यांच्या घरी अनेकदा जायला लागायचे. प्रभात रस्त्यावरील माडगूळकर यांच्या घरी गेल्यानंतर अनेकदा ग. दि. माडगूळकर यांच्याशी भेट होत असे. त्यातूनच जयराम (Jairam Kulkarni) यांनी ग. दि. माडगूळकर यांचे साहित्य वाचण्यास सुरुकात केली. मराठी सिनेदिग्दर्शक अनंतराव माने यांनी जयराम (Jairam Kulkarni) यांना पहिल्यांदा चित्रपटात काम दिले. कोल्हापूर आणि मुंबई येथे चित्रीकरण असल्याने अभिनयाची आवड आणि नोकरी सांभाळताना अनेकदा जयराम यांची तारेवरची कसरत व्हायची. अनेकदा त्यांच्या नोकरीतील रजा संपायच्या. त्यामुळे 1970 च्या सुमारास जयराम यांनी आकाशवाणीच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि ते अभिनय क्षेत्राकडे वळले. आकाशवाणीमुळे त्या वेळचे मोठमोठे कलाकार आणि साहित्यिकांशी जयराम (Jairam Kulkarni) यांची ओळख झाली होती. त्यामुळे चित्रपटात काम करताना पुन्हा एकदा ग्रामीण बोली आणि जयराम (Jairam Kulkarni) या समीकरणानेच प्रत्येक जण त्यांच्याकडे पाहू लागला. सुरुवातीला सरपंच, पाटील अशा ग्रामीण भूमिका जयराम (Jairam Kulkarni) यांनी चित्रपटांतून साकारल्या. परंतु नंतर ‘गंमत जंमत’, ‘दे दणादण’, ‘नवरी मिळे नक्याला’, ‘झपाटलेला’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’ अशा अनेक चित्रपटांत वेगवेगळ्या भूमिका जयराम (Jairam Kulkarni) यांच्या वाट्याला आल्या आणि त्या त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर अजरामर केल्या.

त्यांनी भुमिका केलेले मुख्य चित्रपट म्हणजे अशी ही बनवा बनवी, आमच्या सारखे आम्हीच, खट्याळ सासु नाठळ सुन, खरे कधी बोलु नये, खेळ आयुष्याचा, गम्मत जम्मत, चल रे लक्ष्या मुंबईला, झपाटलेला, झुंज तुझी माझी, थरथराट, दे दणा दण, नवरी मिळे नवऱ्याला, पे्रम दिवाणे (हिंदी), बाळाचे बाप ब्रम्हचारी, रंगत संगत आदी चित्रपटांमधून त्यांनी भुमिका साकारल्या. अशा या हरहुन्नरी कलावंताचे  १७ मार्च २०२० रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले.

लेखक-पद्माकर

जयराम कुलकर्णी यांच्या बद्दल व या लेखा बद्दल आपले अभिप्राय खाली दिलेल्या Comment-Box मध्ये नोंदवायला मात्र विसरू नका,तुमच्या एका Comment मुळे आमच्या लेखकास एक शक्ती व उत्त्साह मिळते.

“तुम्ही आमच्या कामाला पाठिंबा द्याल का? कृपया आज Marathimonday.com ला आर्थिक भेट देण्याचा विचार करा”


Shekhar Jaiswal

Leave a Comment