सूर्यकांत मांढरे (Suryakant Mandhare)

by Shekhar Jaiswal

Suryakant Mandhare

मराठी चित्रपट सृष्टी मध्ये आपल्या जबरदस्त अभिनयाने आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या सूर्यकांत मांढरे (Suryakant Mandhare) यांचा जन्म कोल्हापूर येथे 2 जुन 1926 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव तुकाराम तर आईचे नाव तानुबाई मांढरे असे होते.  त्यांचे थोरले बंधू चंद्रकांत मांढरे हेही त्या काळातील मराठी सिनेसृष्टीत प्रसिद्ध अभिनेते होते.  त्या काळामध्ये चंद्रकांत आणि सूर्यकांत हे नावे जोडीने घेतली जायची. घरामध्ये कोणतीही अभिनयाची पार्श्वभूमी नसताना या दोन्ही बंधूंनी मराठी चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवले ते केवळ आपल्या स्वाभाविक अभिनयाने आणि कलेवरील असलेल्या प्रेमामुळे. सूर्यकांत मांढरे (Suryakant Mandhare) यांचे बालपण कोल्हापुरात गेले. सुरुवातीला कोल्हापुरातील सरस्वती विद्यालयात आणि त्यानंतर हरिहर विद्यालयात त्यांनी आपले शिक्षण घेतले.

Embed from Getty Images

मुळातच कोल्हापुरात असणारी आखाडा संस्कृती आणि शरीर कमावण्याचे वेड यामुळे त्यांनी नियमित व्यायाम करून आपले शरीर कमावले. सूर्यकांत (Suryakant Mandhare) यांचे व्यक्तिमत्व भालजी पेंढारकर यांच्यासारख्या मोठ्या दिग्दर्शकाच्या नजरेस पडले आणि केवळ वयाच्या बाराव्या वर्षी ‘ध्रुव’ या चित्रपटाद्वारे त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. असे असले तरीही शालेय शिक्षण सुरू असतानाच त्यांचा ओढा हा कलेकडे होता. 1943 साली शिक्षण थांबले आणि बाबा गजबर या एका जाणकार चित्रकाराकडे ते चित्रकलेचे धडे घेऊ लागले.

Suryakant Mandhare

दरम्यान याच काळात दिग्दर्शक भालजी पेंढारकर हे शिवचरित्रावर आधारित ‘बहिर्जी’ नाईक हा चित्रपट करत होते. आणि त्यांनी या चित्रपटातील बाल शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी सूर्यकांत मांढरे (Suryakant Mandhare) यांची निवड केली. आणि या चित्रपटापासून भालजींनी वामन मांढरे यांचे नाव बदलून सूर्यकांत असे ठेवले आणि पुढे सर्व चित्रपट त्यांचे नाव सूर्यकांत (Suryakant Mandhare) म्हणूनच पुढे आले.

Image Source – Google | Image By – timesofindia

व्यायामातून कमावलेली शरीरयष्टी आणि कोल्हापुरी रांगडे व्यक्तिमत्व यामुळे त्यांनी ग्रामीण भूमिका चांगल्याच गाजवल्या. चित्रपट सृष्टी मध्ये चांगला जम बसल्यानंतर पुढे 26 डिसेंबर 1947 रोजी त्यांनी सुशीला पिसे यांच्याबरोबर विवाह केला. अभिनय क्षेत्रात व्यस्त असतानाही त्यांनी कधीही आपल्या कुटुंबाकडे मात्र दुर्लक्ष केले नाही. 1950 मध्ये राजा नेने यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘केतकीच्या बनात’ या चित्रपटात त्यांनी सर्जेराव ही भूमिका केली. ‘फक्त प्रौढांसाठी’ असे मराठीत पहिल्यांदाच शिफारस पत्र या चित्रपटाला मिळाले होते. त्यानंतर त्यांनी अनेक एकाहून एक सरस चित्रपटामध्ये नायकाच्या भूमिका साकारल्या. त्यांनी 100 हून अधिक चित्रपट केले. तमाशाप्रधान , ऐतीहासिक, ग्रामीण वेगवेगळ्या विषयावरील अनेक चित्रपट त्यांनी आपल्या भूमिकेने गाजवले. त्यांची अभिनेत्री जयश्री गडकर यांच्याबरोबर जोडी अतिशय लोकप्रिय ठरली.

या जोडीने सत्तावीस चित्रपटांमध्ये एकत्र भूमिका केल्या. चित्रपटांबरोबरच त्यांनी रंगभूमीही गाजवली. त्यांनी बेबंदशाही, अग्र्याहून सुटका,तुझ आहे तुझपाशी, लग्नाची बेडी, झुंजारराव,या नाटकांमधून अभिनय केला.  त्यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीत मुख्य नायक, खलनायक, सहाय्यक अभिनेता, चरित्र भूमिका, पाहुणा कलाकार, तर काही चित्रपटांमध्ये विनोदी भूमिकाही साकारल्या। अस्सल-कोल्हापूरी ग्रामीण भाषा बोलणाऱ्या व धाडसी मर्दानी बाण्याच्या सूर्यकांत (Suryakant Mandhare) यांनी ग्रामीण चित्रपटात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले. भालजी पेंढारकर, आनंद माने,दत्ता माने, कमलाकर तोरणे, अनंत ठाकूर, गजानन जागीरदार, अशा अत्यंत प्रतिभाशाली आदर्श दिग्दर्शक, निर्मात्यांनबरोबर  त्यांना अभिनयाची संधी मिळाली.  1959 साली आलेल्या शिकलेली बायको, या चित्रपटात त्यांची रघुनाथ ही भूमिका अतिशय गाजली.

Suryakant Mandhare

साधी माणसं या चित्रपटात साकारलेला शंकर लोहार प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. 1965 या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले. 1959 मध्ये सांगते ऐका या चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टी मध्ये अभूतपूर्व यश मिळवले.

कन्यादान या चित्रपटातील भूमिकेसाठी सूर्यकांत (Suryakant Mandhare) यांना राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले. चंद्रकांत आणि सूर्यकांत या दोन्ही बंधूंनी एकूण 14 चित्रपटांमध्ये सोबत काम केले. अंतरीचा दिवा, कलंकशोभा, माणसाला पंख असतात, गरिबाघरची लेक,तू सुखी रहा, या चित्रपटातील त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या. 1965 साली ‘मल्हारी मार्तंड’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचे राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले. 

शिलंगणाचे सोने, जय भवानी, महाराणी येसूबाई, थोरातांची कमळा, पावनखिंड, स्वराज्याचा शिलेदार, गनिमी कावा,या ऐतिहासिक चित्रपटांमधून त्यांनी एक ऐतिहासिक नट महाराष्ट्राला दिला.  विशेषता छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये आपल्या शरीरयष्टीमुळे ते हुबेहूब दिसायचे.  चित्रपट सृष्टीत पडद्यावर साहसी दृश्ये साकारताना डमी कलाकारांना वापरतात. परंतु त्यांनी अनेक जीवावर बेतणारे दृश्य स्वतः मेहनतीने वठवली.

सूर्यकांत यांनी 1978 साली ‘ईर्षा’ या चित्रपटाची निर्माता,  दिग्दर्शन आणि पटकथा लेखन ही केले. सूर्यकांत यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अखेर जमल, अंतरीचा दिवा, आयुष्यवंत हो बाळा, कन्यादान, कलंकशोभा, कांचनगंगा, कुलदैवत, केतकीच्या बनात, गरिबाघरची लेख,गाठ पडली ठका ठका, ग्रह देवता, संत चांगदेव,  जगावेगळी गोष्ट, जय भवानी, तोचि साधू ओळखावा, थोरातांची कमळा, थोरातांची मंजुळा, धन्य ते संताजी धनाजी, ध्रुव,संत निवृत्ती ज्ञानदेव, पंचारती, पतिव्रता, प्रीतीसंगम, फकीरा, भाऊबीज, भाव तेथे देव, मल्हारी मार्तंड, महाराणी येसूबाई, मुकी लेकरे, मोहित्यांची मंजुळा, रंगपंचमी, रानपाखरा, शिलंगणाचे सोने, शुभमंगल, सलामी, सांगत्ये ऐका, सांगू कशी मी, सासर माहेर, सासुरवास, स्वराज्याचा शिलेदार, आदी चित्रपटांमधून भूमिका साकाल्या. त्यांना आपल्या चित्रपट कारकीर्दीच्या काळात अनेक चढ-उतार पहावे लागले. या सगळ्या प्रवासात त्यांना त्यांची पत्नी सुशीला यांनी खंबीरपणे साथ दिली. सुशीला यांनी उदय,  किरण, आणि प्रकाश या तिन्ही मुलांचा व्यवस्थित समर्थपणे सांभाळले.

Suryakant Mandhare with her family…

 

अभिनयाबरोबरच त्यांना चित्रकलेची ही मोठ्या प्रमाणात आवड होती. सूर्यकांत (Suryakant Mandhare) यांनी कोल्हापूर मध्ये राजाराम आर्ट गॅलरी आणि चित्रनगरी व्हावी यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी ‘धाकटी पाती’ नावाने आपले आत्मचरित्र लिहिले. या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला। त्यानंतर त्यांनी कोल्हापुरी साज आणि कला महार्शी बाबुराव पेंटर ही दोन पुस्तके लिहिली. त्यांच्या एकूण कारकिर्दीसाठी त्यांना 1973 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच पुढे 1990 चाली त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कारही मिळाला. सूर्यकांत यांच्या नावाने  एक कला दालन  पुण्यामध्ये होते. यामध्ये त्यांच्या  चितत्र, शिल्प कलाकृती, तसेच त्यांना  राज्य सरकार  व विविध  संस्थांकडून  मिळालेले पुरस्कार  जतन करून ठेवण्यासाठी  त्या वस्तू  मांढरे कुटुंबीयांनी  पुणे महापालिकेच्या स्वाधीन केल्या होत्या, त्यानंतर त्यांच्या मुलांनी  त्या वस्तू कोल्हापूर येथे  शिवाजी विद्यापीठाकडे  सुपूर्द केल्या. येथे त्यांनी काढलेली पेंटिंग  तसेच शिल्पे  व त्यांना मिळालेले पुरस्कार पहावयास मिळतात. अशा या रांगड्या व हरहुन्नरी कलाकाराचे वयाच्या 73 व्या वर्षी 22 ऑगस्ट 1999 रोजी निधन झाले.

लेखक-पद्माकर

सूर्यकांत मांडरे यांच्या बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

  1. ग्रामीण चित्रपट’ प्रकार कोणता?
    ‘ग्रामीण चित्रपट’ हा मराठी सिनेमाचा एक प्रकार आहे जो ग्रामीण जीवन आणि संस्कृतीवर केंद्रित आहे. ग्रामीण लोकांचे जीवन, त्यांच्या चालीरीती, परंपरा आणि सामाजिक समस्यांचे चित्रण हे त्याचे वैशिष्ट्य आहे. मराठी चित्रपटसृष्टीत काम केलेले भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माता, लेखक, शिल्पकार आणि चित्रकार सूर्यकांत मांढरे हे सांगते ऐका (1959) आणि मल्हारी मार्तंड (1965) यांसारख्या ग्रामीण चित्रपट शैलीतील चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत.
  2. सूर्यकांत मांडरे यांना त्यांच्या कारकिर्दीत कोणते पुरस्कार आणि सन्मान मिळाले?
    सूर्यकांत मांडरे यांच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाला प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले. मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आणि योगदानाबद्दल त्यांना प्रशंसा मिळाली.
  3. मराठी चित्रपटातील ग्रामीण जीवनाच्या चित्रणावर सूर्यकांत मांडरे यांचा कसा प्रभाव पडला?
    सूर्यकांत मांडरे यांच्या चित्रपटांनी, विशेषतः ‘ग्रामीण चित्रपट’ प्रकारातील ग्रामीण जीवनाचे सार चित्रण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या सूक्ष्म चित्रणांनी ग्रामीण महाराष्ट्राचे वास्तववादी प्रतिनिधित्व केले.
  4. सूर्यकांत मांडरे आणि इतर नामवंत कलाकार यांच्यात काही उल्लेखनीय सहकार्य होते का?
    जयश्री गडकर यांच्यासोबतच्या त्यांच्या प्रतिष्ठित भागीदारीव्यतिरिक्त, सूर्यकांत मांडरे यांनी इतर मान्यवर कलाकारांसोबत सहकार्य केले. सुलोचना आणि उषा किरण यांसारख्या अभिनेत्यांसोबतची त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री त्यांच्या चित्रपटसृष्टीत आणखी भर घालत आहे.
  5. सूर्यकांत मांडरे यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत इतर कलात्मक व्यवसायांशी कसा समतोल साधला?
    सूर्यकांत मांडरे यांनी चित्रकला आणि शिल्पकला यांसारख्या व्यवसायांसोबत अभिनयाचा समतोल साधण्याची क्षमता त्यांच्या विविध कलागुणांना दाखवून दिली. त्याचे कलात्मक प्रयत्न त्याच्या सिनेमॅटिक प्रवासाच्या समांतर चालले आणि त्याच्या सर्जनशील अभिव्यक्तीला खोली जोडली.
  6. ग्रामीण चित्रपट’मध्ये सूर्यकांत मांडरे यांच्या योगदानाचे महत्त्व काय आहे?
    ‘ग्रामीण चित्रपट’ प्रकारात सूर्यकांत मांडरे यांचे योगदान मोठे आहे. सिनेमाच्या माध्यमातून प्रादेशिक संस्कृती जपण्यात हातभार लावत त्यांनी ग्रामीण महाराष्ट्रातील कथा समोर आणल्या.
  7. सूर्यकांत मांडरे यांना चित्रपटसृष्टीतील त्यांच्या समकालीनांनी कसे लक्षात ठेवले आहे?
    सूर्यकांत मांडरे यांचा प्रभाव त्यांच्या समकालीनांच्या आठवणींमध्ये उमटतो. चित्रपट उद्योगातील सहकारी आणि समवयस्क सहसा त्यांचे समर्पण, कलात्मकता आणि सिनेमॅटिक लँडस्केपवर त्यांनी केलेल्या सकारात्मक प्रभावाची आठवण करतात.’

सूर्यकांत मांढरे यांच्या बद्दल व या लेखा बद्दल आपले अभिप्राय खाली दिलेल्या Comment-Box मध्ये नोंदवायला मात्र विसरू नका,तुमच्या एका Comment मुळे आमच्या लेखकास एक शक्ती व उत्त्साह मिळतो.

“तुम्ही आमच्या कामाला पाठिंबा द्याल का? कृपया आज Marathimonday.com ला आर्थिक भेट देण्याचा विचार करा”


Leave a Comment