सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar)

by Shekhar Jaiswal

Sachin Pilgaonkar

मराठी चित्रपट रसिकांच्या मनावर मागील पाच दशकांपासून अधिराज्य गाजवणार नाव म्हणजे अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता सचिन पिळगावकर(Sachin Pilgaonkar) .

सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांचा जन्म १७ ऑगस्ट १९५७ रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे वडील शरद पिळगावकर हे मुंबईत छपाईचा व्यवसाय सांभाळत होते. १९६२ साली आलेल्या ‘हा माझा मार्ग एकला’ या मराठी चित्रपटातून बाल कलाकाराच्या भुमिकेतून वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पन केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना  सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते बाल कलाकारासाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

त्यानंतर बालकलाकार म्हणून त्यांनी ज्वेलथीफ, ब्रह्मचारी, मेला आणि अन्य १५ चित्रपटांतून भूमिका केल्या. त्यानंतर राजश्री प्रॉडक्शन-निर्मित ‘गीत गाता चल’ या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्यानंतर एकामागून एक बालिकावधू, कॉलेज गर्ल, अंखियोंके झरोकोसे आणि नदिया के पार अशा चित्रपटांतल्या प्रमुख भूमिका त्यांनी साकारल्या. त्रिशूल चित्रपटाच्या यशानंतर सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनी शोले, सत्ते पे सत्ता या चित्रपटांत साहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या. त्यांनी मराठी, हिंदी आणि भोजपुरी चित्रपटातही काम केले आहे, तसेच तु तु मै मै, आणि कडवी खट्टी मिठी यासारख्या टिव्ही मालिंकांमधूनही अभिनय केला आहे. त्यांनी बाल कलाकार म्हणून सुमारे ६५ चित्रपटांत काम केले होते आणि गीत गाता चल (१९७५), बालिका बधू (१९७६), अँखियों के झरोखों से (१९७८) आणि नदियां के पार(१९८२) यासारख्या हिंदी चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केले. ते सर्व चित्रपट यशस्वी झाले.

त्यानंतर ते मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात निर्मिती आणि दिग्दर्शनाकडे वळले. आपल्या कारकिर्दीत सचिननं (Sachin Pilgaonkar) हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज मंडळीबरोबर काम केलं आहे. सचिन ने उर्दू भाषा आणि उच्चार हे थेट मीनाकुमारी यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीकडून शिकले आहेत. अक्षरश- एखाद्या मुलाची शिकवणी घ्यावी तशी मीनाकुमारी यांनी सचिनची शिकवणी घेतली. हिंदी चित्रपटसृष्टीतील देव आनंद आणि विजय आनंद यांच्यासारख्या दिग्दर्शकांकडून सचिनला खूप काही शिकायला मिळालं; तर ‘बैराग’च्या निमित्तानं दिलीपकुमार यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला. संजीवकुमार यांच्याबरोबरचा त्यांचा स्नेह घट्ट होता. अमिताभ बच्चन यांच्याबोरबरही त्यांनी दोन-तीन चित्रपटात काम केलं. सचिन यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा चित्रपट ‘अष्टविनायक’ या चित्रपटात सचिनची भूमिका नास्तिक माणसाची आणि नायिका वंदना पंडित यांची भूमिका आस्तिक अशी होती. प्रत्यक्ष जीवनात बरोबर उलटं होतं.वंदना अगदी नास्तिक आणि सचिन आस्तिक आहेत. त्यांनी ‘हाच माझा मार्ग” नावाने आपली आत्मकथा लिहिली आहे. त्यांच्या पत्नीचे नाव सुप्रिया पिळगावकर असून त्या अभिनेत्री आहेत.. त्यांच्या मुलीचे नाव श्रेया पिळगावकर असे आहे. सचिन (Sachin Pilgaonkar) यांनी आपली पत्नी सुप्रियाच्या साथीत ‘नच बलिये’ पहिल्या पर्वाचे विजेतेपद पटकावले आहे.

१९६२ साली त्यांच्या ‘हा माझा मार्ग एकला’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा पुरस्कार मिळाला तर १९७१ साली ‘अजब तुझे सरकार’ या चित्रपटासाठीही पुरस्कार मिळाला. १९७८  साली फिल्मफेअर पुरस्कार देखील त्यांना मिळाला. तर आताच नव्याने आलेल्या २०१६  सालच्या ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.

लेखक-पद्माकर

सचिन पिळगावकर यांच्या बद्दल व या लेखा बद्दल आपले अभिप्राय खाली दिलेल्या Comment-Box मध्ये नोंदवायला मात्र विसरू नका,तुमच्या एका Comment मुळे आमच्या लेखकास एक शक्ती व उत्त्साह मिळते.

“तुम्ही आमच्या कामाला पाठिंबा द्याल का? कृपया आज Marathimonday.com ला आर्थिक भेट देण्याचा विचार करा”


Leave a Comment