लक्ष्मीकांत बेर्डे (Lakshmikant Berde): विनोदाचा बादशहा

by Shekhar Jaiswal

Laxmikant Berde

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आजवर अनेक गुणी कलाकरांनी त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली. या साऱ्या उत्तम कलाकारांच्या गर्दीत आजही एक नाव कायम अग्रस्थानी आहे ते म्हणजे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Lakshmikant Berde).  ‘अशी ही बनवा बनवी’पासून ते अगदी ‘एक होता विदूषक’ या चित्रपटापर्यंत आपल्याला लक्ष्मीकांत बेर्डे (Lakshmikant Berde) यांची वेगळी रुपं पाहण्याची संधी मिळाली. मुख्य म्हणजे आपल्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा अभिनेता कधी सर्वांचा आवडता ‘लक्ष्या’ झाला हे लक्षातही आलं नाही.

लक्ष्मीकांत बेर्डे (Lakshmikant Berde) यांचा जन्म मुंबईतील गिरगावमधील कुंभारवाड्यात २६ ऑक्टोबर १९५४ साली झाला. या कुंभारवाड्यात लहानाचा मोठा झालेल्या लक्ष्मीकांत बेर्डे (Lakshmikant Berde) यांनी युनियन हायस्कूलमध्ये त्यांच शालेय शिक्षण पूर्ण केलं. तर भवन्स कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेतलं.

By India Illustrated – http://digital.lib.uh.edu/u?/p15195coll29,159, Public Domain, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=19544669
[[File:Bhavan’s College.jpg|500px|thumb|Bhavan’s College]]

याच दरम्यान कॉलेजमध्ये असताना ते एकांकिकांमध्ये सहभाग घेत होते. अनेक वेळा साहित्य संघ मंदिरात त्यांनी बॅक स्टेजवरही काम केलं. याकाळामध्ये त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. हा प्रवास सुरु असतानाच त्यांच्या ‘टूरटूर’ या नाटकाने यशाचं शिखर गाठलं. त्यानंतर त्यांना महेश कोठारेच्या ‘धुमधडाका’ (१९८५) या चित्रपटातून मोठा ब्रेक मिळाला. ‘टूरटूर’ आणि ‘धुमधडाका’ या दोन्ही माध्यमातून त्यांनी आपले अष्टपैलुत्व दाखवून प्रचंड लोकप्रियता मिळवली. मराठी नाटक, चित्रपट सुरु असतांनाच ‘मैने प्याार किया’ या चित्रपटातून त्यांचा हिंदी चित्रपटांमध्ये प्रवेश झाला.

Lakshmikant Berde

त्यानंतर साजन, हाम आपके है कोन, यासह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भुमिका साकारल्या. नाटकाच्या माध्यमातून थेट प्रेक्षकांपर्यंत पोहचता येते म्हणून त्याने ‘कार्टी उडाली भुर्रङ्घ’ स्वीकारले. मराठीत ‘दे दणादण’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘थरथराट’, ‘धडाकेबाज’, ‘हमाल दे धमाल’, ‘रंगत संगत’, ‘पटली रे पटली’ असे करत करत ते डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘एक होता विदूषक’ (१९९२) पर्यंत पोहचले. त्याच्या कारकीर्दीतील हा खूपच महत्त्वाचा टप्पा. जोडीला वर्षा उसगावकर, दिलीप प्रभावळकर, निळू फुले, मधु कांबिकर, उषा नाईक, पूजा पवार, विजय चव्हाण अशा तगड्या कलाकार मंडळींची साथही त्यांना मिळाली होती. लक्ष्मीकांत बेर्डे (Lakshmikant Berde) आणि अशोक सराफ यांच्या जोडीने या काळात आपल्या अभिनयाद्वो अक्षरश: धुमाकुळ घातला होता.

लक्ष्मीकांत बेर्डे (Lakshmikant Berde) यांचे रुही या चित्रपट अभिनेत्रीसोबत लग्न झाले होते. रुही बेर्डे यांनी ‘मामला पोरीचा’ ‘आराम हाराम आहे’ या चित्रपटात भुमिका केली. तसेच अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांतून भुुमिका केल्या. रुही यांचे  निधन झाल्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे (Lakshmikant Berde) यांनी प्रिया अरुण या मराठी अभिनेत्री सोबत १९९६ साली विवाह केला.

Lakshmikant Berde
Laxmikant Berde with her wife Priya Arun

त्यांनी अनेक चित्रपटातून एकत्र भुकिका केल्या व त्यांची अशीकाही जोडी जमली की प्रत्यक्ष जिवनात देखील ते एकमेकांचे जोडीरा झाले. दोघांचे एकत्र अनेक विनोदी सिमेना गाजले. त्यांना अभिनयस्वानंदी अशी दोन मुले आहेत. अभिनयाने नुकतेच ‘ ती सध्या काय करते’ या चित्रपटाद्वारे मराठी चितपटसृष्टीत पदार्पन केले आहे.सगळ्यांना खळखळून हसविणाऱ्या या विनोदाच्या बादशहाने १६ डिसेंबर २००४ साली जगाचा निरोप घेतला.

मात्र त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानामुळे आजही ते साऱ्यांच्या स्मरणात आहेत. तब्बल दीड ते दोन दशके आपल्या भुमिकांमधून रसिकांना हासवत ठेवणाऱ्या  लक्ष्मीकांत बेर्डे (Lakshmikant Berde) यांचे अचानक जाणे हे रसिकांच्या मनाला मात्र चांगलेच चटका लावणारे ठरले.

लेखक-पद्माकर

लक्ष्मीकांत बद्दल व या लेखा बद्दल आपले अभिप्राय खाली दिलेल्या Comment-Box मध्ये नोंदवायला मात्र विसरू नका,तुमच्या एका Comment मुळे आमच्या लेखकास एक शक्ती व उत्त्साह मिळते.

“तुम्ही आमच्या कामाला पाठिंबा द्याल का? कृपया आज Marathimonday.com ला आर्थिक भेट देण्याचा विचार करा”


Leave a Comment