मराठी चित्रपट सृष्टीचा इतिहास लिहायचे झाले,तर तो इतिहास चंद्रकांत मांढरे (Chandrakant Mandhare) ..या नावाशिवाय कदापि पूर्ण होणे शक्य नाही, आणि याला कारण म्हणजे चंद्रकांत मांढरे (Chandrakant Mandhare) यांचे मराठी चित्रपट सृष्टीतील असणारे योगदान होय, आणि आज आपण त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत.
चंद्रकांत मांढरे (Chandrakant Mandhare) यांचा जन्म कोल्हापूर शहरातील शनिवार पेठेत 13 ऑगस्ट 1913 रोजी झाला. त्यांची घरची परीस्तीती खूप हलाकीची असल्यामुळे त्यांचे वडील इंग्लिश टोप्या आणि अत्तर विकण्याचा व्यवसाय करायचे, हे करत असताना देखील ,त्यांचा कलचित्रपट व नाटकात देखील होता. कालांतराने घरच्या परिस्थितीत आपला काहीतरी हातभार लागावा यासाठी चंद्रकांत यांनी 1931 मध्ये सांगली मध्ये सुरू झालेल्या ‘बलवंत चित्रपट कंपनी’ मध्ये पंधरा रुपये महिना पगारावर काम करण्यास सुरुवात केली. यामध्ये त्यांनी पडदे रंगविण्याचे काम सुरु केले. परंतु कंपनी बंद झाल्यानंतर त्यांची नोकरी गेली. हे सर्व करत असताना त्यांनी आपला मुळ छंद चित्रकलेकडे मात्र कधीही ही दुर्लक्ष होऊ दिले नाही. चित्रकार असल्याचा त्यांना एक फायदा झाला आजूबाजूच्या गोष्टी टिपून घ्यायची सवय ,प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण आणि अभ्यास करण्याचीही सवय होती.
पुढे काही वर्षांनी बाबूराव पेंटर यांनी त्यांना आपल्या सावकारी पाश या चित्रपटात मुख्य भूमिका दिली. या चित्रपटातील त्यांचा अभिनय खूप गाजला. विशेष म्हणजे सावकारी पाश या मूकपटात व्ही. शांताराम यांनी साकारलेल्या शेतकऱ्याच्या मुलाची भूमिका चंद्रकांत मांढरे (Chandrakant Mandhare) यांनी बोलपटासारखी साकारली. आणि इथूनच त्यांच्या अभिनयचा चढता आलेख सुरू झाला तो कायम आयुष्यभर तसाच राहिला.
चंद्रकांत (Chandrakant Mandhare) यांचे मूळ नाव गोपाळ असे होते परंतु पुढे भालजी पेंढारकर यांनी एका चित्रपटादरम्यान गोपाळ चे नाव बदलून चंद्रकांत हे नाव लावले. पुढे व्ही. शांताराम यांच्या ‘शेतकरी’ या चित्रपटापासून चंद्रकांत हे प्रभात स्टुडिओ मध्ये पूर्णवेळ नोकरी करू लागले. त्या काळामध्ये कोणताही ऐतिहासिक आणि पौरानिक सिनेमा असेल तर त्यामध्ये निर्माता दिग्दर्शकांना चंद्रकांत यांना घेतल्याशिवाय सिनेमाच चालणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ग्रामीण बाज असनार्या भूमिकाही त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण रित्या साकारल्या.पुढे शंभरपेक्षाहि अधिक चित्रपटातून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या.
त्यांची भूमिका किती वैविध्यपूर्ण असायची त्याचे उदाहरण म्हणजे ‘राम राज्य’ या चित्रपटांमध्ये त्यांनी रामाची भूमिका साकारली तर ‘स्वयंवर झाले सीतेचे’ या चित्रपटात त्यांनी रावणाची भूमिका साकारली. त्यांच्या भूमिकेला मिळालेली दाद म्हणजे राम राज्य चित्रपटातील रामाच्या लोक पाया पडायचे तर त्यांनी साकारलेला रावण पाहून तेवढाच द्वेष सुद्धा करायचे. हीच त्यांच्या अभिनयाची पावती होती.
राम राज्य या चित्रपटासाठी त्यांना सातव्या राज्य चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला. युगे युगे वाट पाहिली, पवनाकाठचा धोंडी, संथ वाहते कृष्णामाई या चित्रपटासाठीही त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. खंडोबाची आन या चित्रपटासाठी त्यांना सातव्या राज्य चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देखील मिळाला.
चंद्रकांत हे केवळ कोणतीही भूमिका अद्वितीय करत नसत तर ते त्या व्यक्तिरेखेशी एकरुप होऊन जायचे. ती भूमिका त्या काळात ते जगायचे. त्यामुळे त्या भूमिकेतील अस्सलपणा प्रेक्षकांना भावायचा. हाचत्यांच्या अभिनयाचाउच्चांक होता. निसर्ग हाच खास मानून चित्रकलेची आराधना करणारे ते एक मनस्वी कलावंत होते. चित्रपटाच्या झगमगत्या दुनियेत काम करत असतानाही त्यांनी आपलं पहिलं प्रेम असणाऱ्या चित्रकलेची साथ आयुष्याच्या शेवटपर्यंत कधीही सोडली नाही. कोल्हापुरी रांगडेपणा त्यांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून सिनेमात आणण्याचे काम केले. अशा या गुणी व उत्कृष्ट कलाकाराचा मृत्यू कोल्हापूर येथे 17 फेब्रुवारी 2001 या दिवशी झाला.अशा या कलाकाराला आमचा मनाचा मुझरा.
चंद्रकांत मांढरे (Chandrakant Mandhare) यांनी भूमिका साकारलेले चित्रपट-
खंडोबाची आन, राजा गोपीचंद, थोरातांची कमळा, धन्य ते संताजी धनाजी, पवनाकाठचा धोंडी, बनगरवाडी, भरत भेट, मीठ भाकर, मोहित्यांची मंजुळा, युगे युगे मी वाट पाहिली, छत्रपती शिवाजी, शेजारी, संथ वाहते कृष्णामाई, सांगते ऐका, सावकारी पाश, स्वयंवर झाले सीतेचे. आधी चित्रपट त्यांनी आपल्या अभिनयाने गाजवले.
लेखक-पद्माकर
चंद्रकांत मांढरे यांच्या बद्दल व या लेखा बद्दल आपले अभिप्राय खाली दिलेल्या Comment-Box मध्ये नोंदवायला मात्र विसरू नका,तुमच्या एका Comment मुळे आमच्या लेखकास एक शक्ती व उत्त्साह मिळते.
“तुम्ही आमच्या कामाला पाठिंबा द्याल का? कृपया आज Marathimonday.com ला आर्थिक भेट देण्याचा विचार करा”
- आपण दिवाळी (Diwali)का साजरी करतो? - October 26, 2024
- सूर्यकांत मांढरे (Suryakant Mandhare) - October 26, 2024
- कुलदीप पवार (Kuldeep Pawar)|मराठी व्यक्तिरेखा साकारणारा माणूस - July 14, 2024