Site icon

भगवानदादा (Bhagwandada) : गिरणी कामगाराचा मुलगा ते प्रसिध्दी अभिनेता

Bhagwandada

Bhagwandada

मुंबईतील एका गिरणी कामगाराचा मुलगा ते मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द अभिनेता अशी ओळख निर्माण करणाऱ्या भगवान दादांचा (Bhagwandada) जन्म हा  १ ऑगस्ट १९१३ रोजी अमरावतीमध्ये झाला. भगवान आभाजी पालव हे त्यांच मुळ नाव, परंतु पुढे ते चित्रपटसृष्टीमध्ये भगवानदादा (Bhagwandada) याच नावाने परिचीत झाले.

त्यांचे वडील हे मुंबईमध्ये गिरणी कामगार असल्यामुळे त्यांचे बालपण हे मुंबईतच गेले. चौथीपर्यंतच त्यांनी शिक्षण घेतले, त्यानंतर छोटी-मोठी कामें करुन पैसे कमावण्याकडेच त्यांचा कल होता. मुंबईच्या परेलमध्ये कामगार म्हणून काम करत असतांनाच ते चित्रपटसृष्टीमध्ये काम करण्याचे स्वप्न पाहु लागले. तत्कालीन कलाकार मास्टर विठ्ठल यांच्या कलेने ते भारावुन जावून त्यांनाच आदर्श माणून त्यांच्या प्रमाणे काम करण्याचे स्वन पाहु लागले.

आपल्याला चित्रपटात काम मिळावे, त्यासाठी शरिरयष्टी तयार करण्यासाठी त्यांनी व्यायामशाळेत घाम गाळून शरिरयष्टी निर्माण केली. तसेच या काळात त्यांना कुस्तीही फार आवड होती. परेलमध्ये कामगार म्हणून काम करत असतांना आपल्याला या चित्रपटसृष्टीमध्ये एक दिवस नक्की काम मिळेल या आशेवर ते नेहमीच स्टुडीओच्या चकरा मरायचे,आणि यामध्ये त्यांनी कधीही खंड पडुदिला नाही. एक दिवस तो आलाच,१९३० साली चित्रपट निर्माते सिराज अली हकीम हे ‘बेवफा आशीक’ हा चित्रपट बनवत होते. अणि त्या चित्रपटामध्ये त्यांनी भगवानदादांना (Bhagwandada) एक विनोदी भुमिका साकारण्याची संधी दिली. परंतू ते विनोदी ते पात्र म्हणजे एका विनोदी कुबड्या मानसाचे होते. त्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की अनेकजण हे भगवानदादांना (Bhagwandada) कुबडे समजायला लागले. त्यामुळे पुढील जवळपास आठ महिणे त्यांना एकही भुमिका मिळाली नाही.

त्यानंतर १९३४ साली त्यांनी आपला पहिला चित्रपट साकारला ‘हिम्मते मर्दा’ आणि त्यानंतर त्यांनी दिग्दर्शनात आपले नशीब आजमावत ‘बहादुर किसान’ हा चित्रपट दिग्दर्शीत केला. त्यांचा हा चित्रपट यशस्वी ठरला. याच वेळेस त्यांचे अस्टिटंट म्हणून काम करणाऱ्या सी. रामचंद्र यांच्याशी त्यांची मैत्री जमली.

रामचंद्र यांच संगिताच ज्ञान पाहुण त्यांना संगितकार म्हणून त्यांनी संधी दिली. १९४२ ला त्यांनी निर्मीती क्षेत्रात पाउल ठेवले. जागृती स्टुडीओच्या माध्यमातून त्यांनी काही चित्रपटांची निर्मिती केली आणि त्यानंतर त्यांनी तो स्टुडीओ विकत घेतला. सुरुवातीच्या काळात आगदी काटकसर करुन अत्यंत कमी खर्चात ते चित्रपट बनवु लागले. त्यांनी संपुर्ण कारकिर्दीत ३०० पेक्षा अधिक चित्रपटांमधून काम केले. त्यानंजर जस जसा अनुभव वाढत गेला त्यांना तशा अनेक संधी मिळत गेल्या. १९४२ मध्ये त्यांच्या हातुन एक भयानक घटना घडली, ती म्हणजे एका चित्रपटा दरम्यान त्यांची सह कलाकार ललीता पवार यांच्या कानशिलात लगावण्याचा सक सिन साकारत होते, यावेळी त्यांच्या हातून एवढ्या जोरात मारल्या गेले की ललीता पवार यांच्या डोळ्याची नस फाटली आणि यातून बरे होण्यासाठी ललीता पवार यांना जवळपास तीन वर्षे कालावधी लागला. या घटनेपुर्वी मुख्य भुमिका साकारणाऱ्या ललीता पवार त्यानंतर सहकलाकाराची भुमिका साकारु लागल्या.

अभिनय आणि दिग्दर्शन करत असतांना त्यांना लोकप्रियता मिळत होती आणि त्यांचे सिनेमे पाहण्यासाठी लोक गर्दीही करत होते. त्यांना वाटे की हा काळ ॲक्शनसिनेमांचाआहे. त्यामुळे बहुतांशी चित्रपटात ॲक्शन पहायला मिळत असे. याच दरम्यान स्टुडीओमध्ये एकदा काही कामानिमित्त राजकपुर आणि भगवान दादांची (Bhagwandada) भेट झाली. राजकपुर यांनी ‘भेदी बंगला’ हा त्यांचा सिनेमा पाहिला होता. सिनेमा फारच चांगला होता. सिनेसृष्टीत भगवान दादा (Bhagwandada) यांनी हॉरर आणि सस्पेन्स चित्रपट बनवण्याचे धाडस केले होते. यावेळी राजकपुर यांनी त्यांना सांगितले की तुमच्या कलेची प्रतिभा मी जाणतो पण केवळ ॲक्शन चित्रपटांमध्ये आडकुन न पडता काही सामाजिक चित्रपट बनवून पहा. तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आणि त्याचा परिणाम असा झाला की’आलबेला‘ चित्रपटाची कथा त्यांना सुचली.

या चित्रपटातील गिता बाली आणि भगवान दादांच्या (Bhagwandada) जोडीचे काम रसिकांना फारच भावले, या चित्रपटातील गाीणीही लोकप्रिय झाली.  या आलबेलाने भगवानदांदाना (Bhagwandada) पैसा, प्रसिध्दी आणि बरेच मित्र सार काही मिळवून दिल. आलबेलाच यश पाहता त्यांनी पुन्हा एकदा ‘लाबेला’ आणि ‘झमेला’ यासारख्या चित्रपटांची निर्मिती केली. अणि हे दोन्ही चित्रपट अपयशी ठरले. त्यांना मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यांना खऱ्या अर्थाने आर्थिक नुकसानीत ढकलणारा चित्रपट होता ‘हसंते रहना’ या चित्रपटासाठी त्यांनी आपली होती नव्हती ती जमापुंजी लावली होती. या चित्रपटाचा नायक होता किशोर कुमार. परंतू हा चित्रपट काही पुर्ण होवू शकला नाही. आणि मोठ्या प्रमाणात भगवानदादांना (Bhagwandada) आर्थिक तंगीचा सामना करावा लागला. परिणामी त्यांना आपले जुहुचे राहते घर विकावे लागले.

आठवड्यातील सात दिवस वेगवेगळ्या गाड्या वापरणाऱ्या भगवानदादांना (Bhagwandada) त्यांच्या सातही कार विकाव्या लागल्या. आणि शेवटी दादरच्या एका चाळीमध्ये दोन खोल्यांच्या घरात स्थलांतर कराव लागल. आतीशय वाईट वेळ त्यांच्यावर आली. त्यांना चित्रपट करण्याच धाडस होईना. त्यांनी बऱ्याच चित्रपटांमधून मिळतील त्या भुमिका साकारुन अभिनयाकडे लक्ष केंद्रीत केल. उतार वयात गरीबीचा सामना कराव्या लागणाऱ्या भगवान दादांचा (Bhagwandada) सांभाळ केला तो त्यांच्या चार मुलांनी आणि तीन मुलींनी. वेगवेगळ्या संस्था आणि शासनानही त्यांना पुरस्कार देवून सन्मानीत केले. गरीबीचा सामना करत असतांना बडे साहेब, ‘गजब’, ‘रामभरोसे’, ‘भुलेभटके’ या सारख्या चित्रपटांमधून छोट्यामोठ्या भुमिका साकारणाऱ्या भगवानदादांनी (Bhagwandada) चित्रपटसृष्टीमध्ये अनेक मित्र कमावले. अनेक नट त्यांना भेटण्यासाठी दादरच्या चाळीमध्ये हजेरी लावायचे.

एकेकाळी प्रसिध्दी व श्रीमंतीच्या शिखरावर असणाऱ्या भगवानदादांच्या (Bhagwandada) बाबतीत नियतीची चक्रे अशी काही उलटी फिरली की, आगदी होत्याचे नव्हते झाले. परिस्थिती व शरीर दोन्ही नीटपणे साथ देईनाशी झाली. अन्य अनेक कारणांमुळे दादा खचले. एकेकाळी आलीशान गाड्यांमध्ये फिरणाऱ्या दादांचा शेवट मात्र दुर्दैवी राहिला हे मात्र खर. ४ फेब्रुवारी २००२ रोजी मुंबईतील दादर येथे राहत्या घरी त्यांचे हृदयविकारामुळे निधन झाले.

लेखक-पद्माकर

भगवानदादांन बद्दल व या लेखा बद्दल आपले अभिप्राय खाली दिलेल्या Comment-Box मध्ये नोंदवायला मात्र विसरू नका,तुमच्या एका Comment मुळे आमच्या लेखकास एक शक्ती व उत्त्साह मिळते.

“तुम्ही आमच्या कामाला पाठिंबा द्याल का? कृपया आज Marathimonday.com ला आर्थिक भेट देण्याचा विचार करा”


Exit mobile version