अशोक सराफ (Ashok Saraf): बँक कर्मचारी ते मराठीतील सर्वोत्कृष्ट नंबर1अभिनेता.

by Shekhar Jaiswal

Ashok Saraf

अशोक सराफ (Ashok Saraf) यांचा जन्म ४ जून १९४७ रोजी मुंबई येथे झाला. दक्षिण मुंबईतील चिखलवाडी येथे त्यांचे बालपण गेले. अशोक सराफ हे मुळचे बेळगावचे आहेत.

अशोक सराफ (Ashok Saraf): ‘ययाती आणि देवयानी’ पासून अभिनयाची सुरुवात

त्यांनी शालेय शिक्षण मुंबईतील डी.डी.टी विद्यालयातून पूर्ण केले. अशोक सराफ (Ashok Saraf) यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड.वयाच्या आठराव्या वर्षी त्यांनी  शिरवाडकर यांच्या ‘ययाती आणि  देवयानी’ या नाटकातील विदुशकाच्या भुमिकेतून व्यावसायीक रंगभुमिवर आपल्या अभिनयाची सुरुवात केली. काही संगीत नाटकांतून देखील त्यांनी भुमिका केल्या. त्यांनी १० वर्षे बँकेत नोकरी केली. मात्र त्याठिकाणी त्यांचे मन रमले नाही. नोकरीत कमी आणि नाटकात जास्त वेळ ते काम करायचे. गजानन जहागीरदार यांच्या ‘दोन्ही घरचा पाहुना’ या चित्रपटात त्यांनी छोटीशी भुमिका केली. त्यानंतर दादा कोंडके यांच्या ‘पांडु हावलदार’ मधील पोलिसाची भुमिका साकारली.

अशोक सराफ : मराठी चित्रपट सृष्टीतील ‘मामा’,विनोदी आणि गंभीर अभिनेता

मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वांचे आवडते आणि लाडके ‘मामा’ म्हणजे अभिनेते अशोक सराफ(Ashok Saraf). उत्कृष्ट अभिनय, सहज विनोद प्रवृत्ती, चेहऱ्यावरील कमालीचे हावभाव, विनोदाची अचूक वेळ याच्या जोरावर अभिनेते अशोक सराफ यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. तब्बल ५० वर्षे ते आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. नाटक, मराठीसोबतच अनेक हिंदी मालिका आणि चित्रपट असा अशोक सराफ यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास राहिला आहे. नाटकातूनच त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अशोक सराफ यांनी फक्त विनोदीच नाही तर गंभीर स्वरुपापासून ते खलनायकापर्यंच्या अनेक भूमिका साकारल्या आहेत. १९६९ साली ‘जानकी’ या मराठी चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांनी २५० पेक्षा जास्त मराठी चित्रपटात काम केले. त्यातील १०० चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाले.

‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘गंमत जंमत’, ‘अशी ही बनवाबनवी‘, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘कुंकू’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘एक गडी बाकी अनाडी’, ‘वजीर’ यांसारख्या प्रमुख चित्रपटात त्यांनी काम केले. त्यांचे हे चित्रपट खूप गाजले. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बर्डे यांची जोडी सुद्धा खूप गाजली. या जोडीने केलेल बहुतेक चित्रपट हे सुपरहीट ठरले. अशोक सराफ यांच्या ‘अशी ही बनवा बनवी’ या चित्रपटाला खूप यश मिळाले.

Ashok Saraf
Ashok Saraf

त्याचसोबत त्यांनी महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर यांच्यासोबत काम केले. अशोक सराफ यांना त्यांच्या अभिनयासाठी आतापर्यंत फिल्मफेअर पुरस्कार, महाराष्ट्र शासन पुरस्कार, महाराष्ट्र राज्य नाट्य पुरस्कार, झी गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. मराठीसोबतच अनेक हिंदी चित्रपटात अशोक सराफ यांनी काम केले. अशोक सराफ यांनी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या. ‘सिंघम’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘कुछ तुम कहो कुछ हम कहे’, ‘बेटी नं. वन’, ‘जोरु का गुलाम’, ‘गुप्त’, ‘कोयला’, ‘येस बॉस’ आणि ‘करण अर्जुन’ या चित्रपटात चांगल्या आणि लक्षात राहतील अशा भूमिका त्यांनी साकारल्या.

मराठी आणि हिंदी चित्रपटांसोबतच अशोक सराफ यांची अनेक नाटके आणि मलिका गाजल्या. ‘हम पांच’ या हिंदी मलिकेतील त्यांची आनंद माथुरची भूमिका खूप गाजली. ‘डोन्ट वरी हो जाएगा’, ‘छोटी बडी बातें’ यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये देखील त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या.

अशोक सराफ (Ashok Saraf)यांनी अभिनेत्री निवेदिता जोशी यांच्यासोबत लग्न केले. अशोक सराफ यांना अनिकेत हा एकुलता एक मुलगा आहे. त्यांनी स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस ‘अनिकेत टेलीफिल्म्स’ या नावाने सुरु केले. या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून त्यांनी ‘टन टना टन’ ही मराठी मालिका आणि काही हिंदी मालिका तयार केल्या. या मालिका सुद्धा खूप गाजल्या.

लेखक-पद्माकर


अशोक सराफ यांच्या बद्दल व या लेखा बद्दल आपले अभिप्राय खाली दिलेल्या Comment-Box मध्ये नोंदवायला मात्र विसरू नका,तुमच्या एका Comment मुळे आमच्या लेखकास एक शक्ती व उत्त्साह मिळते.

“तुम्ही आमच्या कामाला पाठिंबा द्याल का? कृपया आज Marathimonday.com ला आर्थिक भेट देण्याचा विचार करा”


Ravindra Mahajni

रवींद्र महाजनी (Ravindra Mahajni)

रवींद्र महाजनी (Ravindra Mahajni) यांचा जन्म बेळगावचा. रवींद्र (Ravindra Mahajni) दोन वर्षांचे असताना वडिलांनी नोकरीसाठी मुंबईला मुक्काम हलवला. रवींद्र महाजनी (Ravindra Mahajni) यांचे वडील ह. रा. महाजनी हे स्वातंत्र सैनिक …

Read more

Niluphule

निळू फुले (Nilu Phule)|”खलनायकाच्या मुखवटाच्या मागे: निळू फुले यांच्या उल्लेखनीय कारकिर्दीची कहाणी”

भारतीय चित्रपट आणि रंगभूमीच्या जगात, काही व्यक्ती एक अमिट छाप सोडतात जी काळ आणि पिढ्या ओलांडतात. निळू फुले (Nilu Phule) यांचा जन्म ४ एप्रिल १९३० रोजी पुण्यात झाला. ते एक …

Read more

chankant Mandhare

चंद्रकांत मांढरे (Chandrakant Mandhare) कोल्हापूरच्या मातीतील रांगडा अभिनेता…

मराठी चित्रपट सृष्टीचा इतिहास लिहायचे झाले,तर तो इतिहास चंद्रकांत मांढरे (Chandrakant Mandhare) ..या नावाशिवाय कदापि पूर्ण होणे शक्य नाही, आणि याला कारण म्हणजे चंद्रकांत मांढरे (Chandrakant Mandhare) यांचे मराठी चित्रपट …

Read more

Usha Naik

उषा नाईक (Usha Naik)

उषा नाईक (Usha Naik) या मुळच्या बेळगावच्या  परंतु पुढे त्यांनी आपली कारकीर्द ही मराठी चित्रपटसृष्टीमध्ये घडवली. त्यांनी नृत्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेल होत.  पण कोल्हापुर भागात प्रसिध्द असलेले लावणीनृत्य  येत नसल्यामुळे …

Read more

Dada Kondke

दादा कोंडके (Dada Kondke): मराठी चित्रपटसृष्टीचा अनभिषीक्त सम्राट

दादांचा (Dada Kondke) जन्म लालबागच्या,गिरणी-कामगाराच्या पोटी ८ ऑगस्ट १९३२ रोजी, गोकुळाष्टमीच्या शुभप्रसंगी लाभलेल्या या पुत्र’रत्ना’चे कृष्णा म्हणून नामकरण करण्यात आले. पोरक्या वयातच या कृष्णाच्या लीला उसळून बाहेर येऊ लागल्या.शाळकरी वयातच …

Read more

Jaishri Gadhkar

जयश्री गडकर (Jaishri Gadhkar): मराठी चित्रपट सृष्टीतील एक रुपेरी पान

मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील एक झळाळत रुपेरी पान म्हणजे जयश्री गडकर (Jaishri Gadhkar),  ज्यांनी 50 वर्षे आपल्या समृद्ध अभिनयाने या मराठी चित्रपट सृष्टीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले, त्या जयश्री …

Read more

Ranjana Deshmukh

रंजना देशमुख (Ranjana Deshmukh)

रंजना (Ranjana Deshmukh) या सुप्रसिध्द अभित्री वत्सला देशमुख यांच्या कन्या होत्या. तर प्रसिध्द अभिनेत्री संध्या त्यांच्या मावशी होत्या. त्यामुळे अभिनयाचे बाळकडु त्यांना घरातूनच मिळाले. त्यांनी अत्यंत कमी वयात आपल्या अभिनयाची …

Read more

Rakesh Bedi

राकेश बेदी (Rakesh Bedi):”भाबीजी घर पर हैं!” मधील भूरे लाल

राकेश बेदी (Rakesh Bedi)v, ज्येष्ठ भारतीय चित्रपट, रंगमंच आणि टेलिव्हिजन अभिनेते, यांनी त्यांच्या अष्टपैलू प्रतिभा आणि मोहक कामगिरीने मनोरंजन उद्योगावर अमिट छाप सोडली आहे. 1 डिसेंबर 1954 रोजी नवी दिल्ली, …

Read more

Shilpa Shinde

शिल्पा शिंदे (Shilpa Shinde):”भाबीजी घर पर हैं! ची जुनी अंगुरी भाबी”

भारतीय टेलिव्हिजनच्या दोलायमान टेपेस्ट्रीमध्ये, एक नाव ज्याने अमिट छाप सोडली आहे ते म्हणजे शिल्पा शिंदे (Shilpa Shinde). 28 ऑगस्ट 1977 रोजी मुंबई, महाराष्ट्र, भारत येथे जन्मलेल्या, 1999 मध्ये पदार्पण केल्यापासून …

Read more

Anup Upadhyay

अनुप उपाध्याय (Anup Upadhyay): ”भाबीजी घर पर हैं!” मधील डेव्हिड मिश्रा

अनुप उपाध्याय(Anup Upadhyay), अष्टपैलू भारतीय अभिनेता, त्याच्या निर्दोष कॉमिक टाइमिंगसाठी प्रसिद्ध आहे, त्याने दूरदर्शन, चित्रपट आणि थिएटरमधील प्रेक्षकांना मोहित केले आहे. हा लेख अनुप उपाध्याय(Anup Upadhyay) यांचे जीवन आणि कारकीर्द …

Read more

Leave a Comment